Contact Us:

+918308503793

welcome to Aastha Parivar

ऊद्देशात्मक कार्य आणि समाजाचा सर्वांगीण विकास

आस्था परिवार हा समाजातील वेल सेटल्ड व सिलेक्टेड अशा कार्यकर्त्यांचा परिवार आहे ज्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपलं योगदान द्यायचे आहे.

प्रबोधन, शिक्षण, संघटन व सहकार

Contact Us

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी

वेल सेटल्ड

वेल सेटल्ड याचा अर्थ जे आपल्या बौध्दीक क्षमतेच्या जोरावर ऊच्च पदावर व नोकरी मध्ये आहेत. तसेच आपला ऊद्योग किंवा व्यवसाय सांभाळुन वैयक्तिक समाजसेवेमधुन नाव लौकिक प्राप्त आहेत आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना ठेवतात..

सिलेक्टेड

सिलेक्टेड याचा अर्थ समाजातील असे व्यक्ती /तरुण जे सामाजीक कार्यात सतत पुढे असतात. विविध संघटना ,संस्था वा पक्षाचे माध्यमातून आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी आग्रह करतात व प्रयत्न करतात. स्वतः पुढाकार घेऊन आपल्या लोकांचे संघटन असावे असे यांना सतत वाटत असते.योगदान देणे व कार्य पार पाडणे यासाठी हा सिलेक्टेड कार्यकर्ता केव्हाही तयारच असतो.

About Us

आस्थाचे ध्येय

समाजाचा सर्वांगीण विकास साधणे.
असे निश्चीत करण्यात आले आहे.
ध्येयपुर्तीसाठी आस्थाचे ऊद्देश ठरविण्यात आले आहे , जेणेकरुन एकेका ऊद्देशपुर्तीकरीता नियोजनबध्द कार्य करणे सहज शक्य होईल.
आस्थाचे ऊद्देश –

1.सामाजीक विकास
2.आर्थीक विकास
3.शैक्षणीक विकास
4.राजकीय विकास

आस्था- सर्वगुणसंपन्न संस्थात्मक पर्याय..

आस्थामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कार्यकर्ते आहे. शेती, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक, राजकीय, संरक्षण, विज्ञान, तंत्रशिक्षण, अभियंता, अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणारी मंडळी आस्थाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रातील समस्येवर आस्था पर्याय आहेत.

आस्था- आर्थिक उन्नतीचे व्दार...

अडचणी येणे हा जीवनाचा भाग आहे.पण त्या सोडवताना आपली माणसे,आपली संस्था असणे ही भाग्याची बाब आहे.आस्था समाजाचा सार्वंगिण विकासाचा महत्वाचा स्त्रोत आहे.यातून समाजाच्या पैशातून समाजाचा विकास अन् आत्मिक समाधान देणारा विकल्प म्हणजेच आस्था.
आर्थिक प्रगतीचे व्दार म्हणजे आस्था. यात सामावलेला प्रत्येक घटकासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सहकार क्षेत्रातील उन्नती चे दालने खुल्या मनाने, निरपेक्षपणे खोलणारा दरवाजा म्हणजे आस्था.

आस्था- शैक्षणिक वारसा चालवणारी संस्था..

आपल्या महाराष्ट्राला शैक्षणिक क्षेत्राचा गौरवशाली वारसा समृद्ध वारसा लाभला आहे. आस्था हाच वारसा चालवित आहेत. समाजाच्या तळागळात जाऊन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर आहे. हीच आहे विचारधारेची ताकद. हाच आहे कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीज्योती सावित्रीमाई, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुखांचा वारसा.

Join our mission. Volunteer, Donate, Advocate. Get Started Today.

Call: ८३०८५०३७९३